आपल्या सवंगड्यांसोबत
कुठेही जाण्यात आनंद असतो, मग ते ठिकाण तसं तितकंसं महत्वाचं नसतं. तसंच आई, बाबा कोणी आजूबाजूला
नसताना आपल्या वस्तूंची काळजी आपण घ्यायची, कुठे काही विसरत नाही ना हे बघायचं ही सवय पण
सहलीमुळे लागते. एरवी उठ म्हणून हाक मारून थकणाऱ्या आईला,
यादिवशी मात्र मूल उठवत. यंदा
आमची सहज संभाजी भाग आणि स्वामीनारायण मंदिर इथे गेली होती. संस्थेच्याच अजून एका
शाखेत मुलींना नेलं. भरपूर खेळ, छान छान खाऊ आणि नवीन ठिकाण याचा मुलींनी आनंद घेतला.