गणित आणि विज्ञान या एकाच
नाण्याच्या दोन बाजू, दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण. वर्षभर छोटे छोटे प्रयोग दाखवू
मुलींना विज्ञानाची ओळख करून दिली जाते. विज्ञान दिनाच्या निमित्ताने मुलींना एका
छोट्या नाटुकल्या मधून विज्ञाचा प्रयोग समजावून सांगितला. आपले भारतीय शास्त्रज्ञ
गणितज्ञ याविषयी मुलींना माहिती दिली. अनेक महत्वाचे शोध हे भारताने जगाला दिलेली
देणगी आहे हेही सोदाहरण सांगितले.