शाळा सुरु झाली कि आषाढ
संपत आलेला असतो मग पावसाळा आणि श्रावणाची चाहूल लागते. एका पाठोपाठ येणारे सण
आषाढी एकादशी, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, श्रावणी शुक्रवार,नवरात्र सगळेच शाळेत
मोठ्या उत्साहात साजरे केले. "Science Behind
Rituals " या तत्वावर मुलांना हे सण
साजरे करण्यामागचं विज्ञान समजावून सांगितलं. त्यादिवशी काय ल्यावे ते काय खावे
इथंपर्यंत प्रत्येक गोष्टीला असलेला वैज्ञानिक आधार सांगून सण साजरे केले गेले.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जवळ जाण्यासाठी संस्कृतीपासून लांब जावं लागत नाही हे
अधोरेखित करत वर्षातील सगळे सांस्कृतिक उत्सव साजरे केले गेले.