अंकपर्व

18 Apr 2024 15:09:40
म्हणे भोपळा मी शून्याला
सदा हवा मज नंबर पहिला
आईलाही म्हणते नेहमी
खाऊ ताईला जास्त नि मला का
कमी
आकडेमोड समजत नसली
तरी गणित समजते
अंकांची गोडी लागली कि
शिक्षणाचे भविष्य चमकते
अंक आणि गणित याला आपण
आयुष्यातून वजा करूच शकत नाही. पण गणिताचा बागुलबुवा न करता, खेळातून गणिती संकल्पना
मुलींना समजावून सांगणं आणि गणिताची त्यांना गोडी लागणं यासाठी वर्षभर विविध उपक्रम
चालूच असतात त्यातील एक म्हणजे गणित दिवस. गणित साहित्याची प्रदर्शनी पालकांनी
देखील आवर्जून पहिली आणि पुन्हा एकदा मुलींनी गणिताची उजळणी केली.
Powered By Sangraha 9.0