झाडाचं पान तोडायच्या आधी, त्याची माफी मागायला
शिकवणारी आपली भारतीय संस्कृती, आपल्याकडे वृक्ष पूजा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे.
वेगवेगळ्या निमित्ताने आपण तुळस, वड, पिंपळ अशा वेगवेगळ्या वृक्षांची पूजा करत असतो. आम्ही शाळेत
कल्पवृक्षाची म्हणजेच नारळाच्या झाडाची पूजा केली. नारळाच्या झाडाच्या प्रत्येक
भागाचा आपल्याला काय उपयोग होतो हे सांगितले, मुलींनी नारळाच्या झाडाच्या वेगवेगळ्या उपयोगी आणि
शोभेच्या वस्तू तयार केल्या. नारळाच्या बर्फीचा आस्वाद घेतला. मुलींना भेटायला
वासुदेव पण शाळेत आला होतं बरं का!