आरुणि विद्या मंदिर

26 Feb 2024 15:09:37
 
 
School Image
संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. लहान वयात मन संस्कारक्षम आणि टिपकागदाप्रमाणे प्रत्येक गोष्ट शोषून घेणारं असतं. तेव्हाच उत्तम विचार करण्याची सवय लागली की तेच कृतीतही उतरतात. आपल्या आनंदाच्या, यशाच्या, करमणूकीच्या वाख्या पडताळून बघणं हे ही उत्तमरीत्या साधण्याचं हेच वय. विचारांच्या कक्षा हळुवार रुंदावत जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करून घेण्याची आवड याच वयात लागते. पहाटेचा सूर्यप्रकाश जसा स्वतःच्या आभेने सावकाश पूर्ण विश्वाला उजळून टाकतो तसच स्वतःच संपूर्ण आयुष्य प्रकाशमान करत त्या प्रकाशाचा इतरांनाही लाभ व्हावा हाच आमचा मानस.
 
निसर्गरम्य परिसर, सुसज्ज आवार, प्रशिक्षित शिक्षक आणि महर्षी आण्णांनी उभ्या केलेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे पाठबळ व मार्गदर्शन या सगळ्याच्या सहाय्याने तीन ते सहा वयोगटातील मुलांच्या बौद्धिक, शारीरिक व मानसिक विकासाकडे आम्ही पूर्ण लक्ष देतो.
 
आरुणि विद्या मंदिरातील हा बालशिक्षणाचा प्रवास विशेष उल्लेखनीय आहे तो खालील गोष्टींमुळे -
 
Aaruni-1
 
 
आत्मनिर्भर - इथे मुलांना स्वावलंबनाचे धडे दिले जातात. आपली कामे आपण करावी हे आम्ही शिकवतो. याचबरोबर माझा देश, माझे कुटुंब, माझे शिक्षक, माझा मित्रपरिवार मला प्रिय असतानाच मी स्वतः देखील मला प्रिय आहे आणि म्हणूनच मानसिकरित्या देखील स्वावलंबी असेन हे मुलांच्या मनात रुजवण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
 
 
Aaruni-2
 
 
आनंद - शिक्षण म्हणजे सक्ती नाही तर आनंद आहे. नवीन गोष्टी शिकण्यात, ज्या न लागणाऱ्या किंवा चुकीच्या गोष्टी शिकलो आहे त्या विसरण्यात, एकूणच शिक्षणाच्या प्रक्रियेला आनंददायी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
 
 
 
Aaruni-3
 
 
अनुभव - केवळ पुस्तकी ज्ञानामध्ये न अडकता, शक्य त्या सर्व गोष्टी स्वतः करून बघून, अनुभवातून त्या शिकवण्याकडे आमचा कल असतो.
 
 
 
 
Aaruni-4
 
 
 
 आपुलकी - माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि म्हणूनच केवळ आत्मकेंद्रित विचार, वागणूक न राहता सर्वांना सामावून घेण्याची, आपुलकीने एकमेकांशी वागण्या बोलण्याची रुजवात इथे होते.
 
 
Aaruni-5
 
 
अजिंक्य - यशाकडे नेणारा खडतर मार्ग हा त्या यशाचं आणि पर्यायाने अजिंक्य होण्याचं समाधान अजून जास्त वाढवतो, याची जाणीव करून देण्याचं काम आम्ही करतो.
 
  
 
Aaruni-6
 
 
आकलन - बुद्धीचे तीन पैलू म्हणजेच प्रज्ञा, मेधा आणि प्रतिभा या तिन्हीला तितकंच महत्त्व प्राप्त करून देत आकलनशक्ती वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
 
  
 
Aaruni-7
 
 
अनुशासन - आनंद, अनुभव यातून शिकताना शिस्त कुठेही मागे पडणार नाही, उलट शिस्तीतूनच हा प्रवास सोपा आणि सुखकर होतो हा आमचा विश्वास आहे.
 
  
 
Aaruni-8
 
 
 
आत्मविश्वास - कोणत्याही न्यूनगंडाला न जुमानता आत्मविश्वासाने ध्येय साध्य करण्याचं प्रोत्साहन इथे मुलांना मिळतं, आणि हा आत्मविश्वास अति आत्मविश्वासाकडे झुकणार नाही याचीही काळजी घेतो.
 
  
Aaruni-9
 
 
 
आराधना - कोणतीही चांगली गोष्ट साध्य करण्यासाठी त्याचा ध्यास घेण्याची, तिची आराधना करण्याची गरज मुलांना इथे पटवून दिली जाते.
 
 
 
Aaruni-10
 
 
आरोग्य - उत्तम आरोग्य हीच आपल्याकडे असणारी खरी संपत्ती आहे म्हणून मुलांच्या शारीरिक मानसिक आरोग्याकडे संपूर्ण लक्ष दिले जाते व आरोग्यपूर्ण वातावरणातच त्यांचे संगोपन केले जाते.
 
 
 
 
Aaruni-11
 
 
अभिनवता - जुन्या गोष्टी सोबत घेत, जुन्या नव्याचा संगम साधत प्रत्येक उपक्रमात आणि अभ्यासात अभिनावता आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.
 
 
  
Aaruni-12
 
 
 
आरुणि - विद्येच्या या मंदिरातून बाहेर पडणारा प्रत्येक किरण एक उत्तम विद्यार्थी, उत्तम नागरिक आणि उत्तम माणूस असेल याची आम्हाला खात्री वाटते.
Powered By Sangraha 9.0