Activities

सांस्कृतिक संगम

शाळा सुरु झाली कि आषाढ संपत आलेला असतो मग पावसाळा आणि श्रावणाची चाहूल लागते. एका पाठोपाठ येणारे सण आषाढी एकादशी, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, श्रावणी शुक्रवार,नवरात्र सगळेच शाळेत मोठ्या उत्साहात साजरे केले. "Science Behind Rituals " या तत्वावर मुलांना हे सण साजरे करण्यामागचं विज्ञान समजावून सांगितलं. त्यादिवशी काय ल्यावे ते काय खावे इथंपर्यंत प्रत्येक गोष्टीला असलेला वैज्ञानिक आधार सांगून सण साजरे केले गेले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जवळ जाण्यासाठी संस्कृतीपासून लांब जावं लागत नाही हे अधोरेखित करत ..

दीपोत्सव

आपली भारतीय संस्कृती मधील अनेकांचा सगळ्यात आवडता सण म्हणजे दिवाळी. यावर्षीची आपली थीम "संवाद" अशी होती. त्याला अनुसरून दीपोत्सव कार्यक्रमाची सजावट करण्यात आली. माणसाचा निसर्गाशी असलेला संवाद, बदलत्या प्रहरासोबत बदलणारा, संवादाची सप्तपदी, संवादावरील विविध कविता यांनी शाळा सजली होती. सर्व पालक, विद्यार्थी आणि सर्व शाखांमधील कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहून कार्यक्रम अधिकच प्रकाशमान केला...

गणेशोत्सव

बुद्धीचे आराध्य दैवत म्हणजे श्री गजानन, शिक्षणाचा श्रीगणेशा करताना याला आपण नेहमी वंदन करतो. या गणेशोत्सवाला संवादाची वेगवेगळी माध्यमे, स्पर्श, गंध, डोळे यातून साधलेला संवाद यासाठी मुलींचे घेतलेले विविध उपक्रम कार्यक्रमाचे आकर्षक बिंदू होते. याचबरोबर विविध ओरिगामी मॉडेल द्वारे सजावट करून, जलचर, कीटक, पक्षी, प्राणी एकमेकांशी कसा संवाद साधतात यावर मुलींना माहिती देण्यात आली...

क्रीडा महोत्सव

आजकाल शाळांना दुर्मिळ होत चाललेलं मोठं मैदान, आम्हाला मात्र लाभलं आहे. अभ्यासातील प्रगती बरोबरच शारीरिक विकास आणि निखळ आनंद तेवढाच महत्वाचा आहे. मातीमध्ये मनसोक्त भरपूर खेळण्याचा आनंद या निमित्ताने मुलींना मिळतो. वैयक्तिक, जोडीने तसेच गटामध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. थंडगार सरबत आणि छोट्या छोट्या बक्षिसांनी या स्पर्धांची रंगत वाढवली...

शब्द सारथी

ज्याला भाषा नीट येते त्याला सगळ्या विषयांचं आकलन उत्तम होतं आणि ज्याला मातृभाषा उत्तम येते त्याला इतर भाषा शिकणं सोपं होतं, यावर आमचा विश्वास आहे.मराठी राजभाषा दिवस, मराठी गौरव दिवस, संस्कृत सप्ताह, इंग्रजी खेळ व साहित्य प्रदर्शनी असे विविध उपक्रम या वर्षभरात पार पडले. प्रत्येक भाषेतील सौंदर्य स्थळं मुलांना कळावीत या हेतूने विविध भाषेतील गोष्टी सांगणे, पुस्तके वाचून दाखवणे, गाणी घेणे असे विविध उपक्रम घेण्यात आले...

वार्षिक स्नेहसंमेलन

अभ्यासाबरोबर इतर कलागुणांना वाव देणे आणि आत्मविश्वाने सगळ्यांसमोर आपले कलागुण सादर करणे यासाठी दरवर्षी अगदी आनंदाने आणि उत्साहाने होणारा उपक्रम म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन. यावर्षीच्या "संवाद" थिम प्रमाणे अगदी लहान गटापासून ते पालकांपर्यंत विविध कार्यक्रमांची मेजवानी होती. त्यामध्ये संवाद देवाशी, संवाद स्वतःशी, मनाशी, ग्रहणाऱ्यांशी, लहान मुलांच्या मनातील सुपर हिरोंशी,अगदी फुलपाखरांशी सुद्धा. यावर विविध नाच तसेच नाटक सादर करण्यात आले. पालकांनी आईशी संवाद हा कार्यक्रम सादर केला...

कल्पवृक्ष दिवस

झाडाचं पान तोडायच्या आधी, त्याची माफी मागायला शिकवणारी आपली भारतीय संस्कृती, आपल्याकडे वृक्ष पूजा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. वेगवेगळ्या निमित्ताने आपण तुळस, वड, पिंपळ अशा वेगवेगळ्या वृक्षांची पूजा करत असतो. आम्ही शाळेत कल्पवृक्षाची म्हणजेच नारळाच्या झाडाची पूजा केली. नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा आपल्याला काय उपयोग होतो हे सांगितले, मुलींनी नारळाच्या झाडाच्या वेगवेगळ्या उपयोगी आणि शोभेच्या वस्तू तयार केल्या. नारळाच्या बर्फीचा आस्वाद घेतला. मुलींना भेटायला वासुदेव पण शाळेत आला होतं बरं का!..

सहल

आपल्या सवंगड्यांसोबत कुठेही जाण्यात आनंद असतो, मग ते ठिकाण तसं तितकंसं महत्वाचं नसतं. तसंच आई, बाबा कोणी आजूबाजूला नसताना आपल्या वस्तूंची काळजी आपण घ्यायची, कुठे काही विसरत नाही ना हे बघायचं ही सवय पण सहलीमुळे लागते. एरवी उठ म्हणून हाक मारून थकणाऱ्या आईला, यादिवशी मात्र मूल उठवत. यंदा आमची सहज संभाजी भाग आणि स्वामीनारायण मंदिर इथे गेली होती. संस्थेच्याच अजून एका शाखेत मुलींना नेलं. भरपूर खेळ, छान छान खाऊ आणि नवीन ठिकाण याचा मुलींनी आनंद घेतला...

अंकपर्व

म्हणे भोपळा मी शून्याला सदा हवा मज नंबर पहिला आईलाही म्हणते नेहमी खाऊ ताईला जास्त नि मला का कमी आकडेमोड समजत नसली तरी गणित समजते अंकांची गोडी लागली कि शिक्षणाचे भविष्य चमकते अंक आणि गणित याला आपण..

विज्ञान आनंद

गणित आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू, दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण. वर्षभर छोटे छोटे प्रयोग दाखवू मुलींना विज्ञानाची ओळख करून दिली जाते. विज्ञान दिनाच्या निमित्ताने मुलींना एका छोट्या नाटुकल्या मधून विज्ञाचा प्रयोग समजावून सांगितला. आपले भारतीय शास्त्रज्ञ गणितज्ञ याविषयी मुलींना माहिती दिली. अनेक महत्वाचे शोध हे भारताने जगाला दिलेली देणगी आहे हेही सोदाहरण सांगितले...